logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

जानाई देवी उत्सव

समस्त जेजुरीकर ग्रामस्थांची जानाई देवी ही ग्रामदेवता समजली जाते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जानाई देवीचे मंदिर आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिरात रोज सकाळी पुजा आरती व धार्मिक विधी होतात. नवरात्रामध्ये देवीचे घट बसवून नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. जयाद्री डोंगररांगेच्या कुशीत कडेपठार व खंडोबा गडकोट मंदिर यांच्यामधील दरीत जानाई देवीचे मंदिर आहे. मात्र सातारा जिल्हयातील पाटण तालुका निवकणे गावच्या सह्याद्रीच्या दरीत जानाई देवीचे मुळ स्थान समजले जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुद्ध अष्टमीला निवकणे येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या वेळी सहा दिवस अगोदर जेजुरी येथून जानाई देवीचा पायी पालखी सोहळा निवकणे कडे मार्गस्थ होतो. या मार्गावरील काऊदरा येथे होणारी निसर्गपुजा या विधीची राज्यात सर्वत्र चर्चा होत आहे. अष्टमी, नवमी, दशमी करून उत्सव सोहळा परत माघारी फिरतो व होळी पौर्णिमेच्या दिवशी जेजुरीत दाखल होतो. देवीचे दर्शन घेतल्यानंतर घरोघरी होळी पौर्णिमा साजरी केली जाते. खंडोबा गडावरही खंडेरायाचा होळी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करतात.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.