logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

जागरण-गोंधळ व गाठा

कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये जागरण गोंधळ ही एक मोठी परंपरा आहे. जागरण म्हणजे रात्रभर जागून कुलदैवताच्या चरित्राचे लोकगिते, लोकभुमिका, संवाद, निरूपण अशा मौखिक संस्कारातून वाद्यांच्या साथीने नृत्यासह परंतु श्रद्धात्मक भाविकतेतून उपासकांकरवी (लोककलावंत, वाघ्या मुरळी) सादर होणारे आणि तेवढ्याच तन्मयतेने श्रोतावृदांकडून आस्वाद घेतला जाणारे अध्यात्मप्रधान प्राकृतिक विधीनाट्य अथवा लोकनाट्य म्हणजे जागरण गोंधळ होय. विशेषत: घरामध्ये विवाह झाल्यानंतर हा विधी 'कुलाचार' म्हणून केला जातो. संसारीक जिवनात व प्रपंचात पुढे गोंधळ निर्माण होवू नये म्हणून आतापासून जागे रहा.... ! हे या विधीमागचे सामाजिक लोकतत्व आहे. 'जागरण म्हणजे जागर' याचाच अर्थ जयजयकार. थोडक्यात खंडोबा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचा साग्रसंगीत विधीयुक्त जागर करायचा म्हणजे भविष्यात प्रपंचात येणारी विघ्ने अडी अडचणी आपोआप दुर होतील आणि संसाराची घडी निविघ्नपणे पैलतिराला पोहोचेल म्हणजेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुख-शांती- समाधान लाभेल, अशी या मागची भोळी भाबडी श्रद्धा आहे. पुर्वांपार चालत आलेले रूढी संस्कार हेच तर आहेत.

गाठा : मणीमल्ल दैत्यांच्या संहारासाठी इंद्राने जेव्हा शंकराजवळ वारी (भिक्षा) मागीतली होती, त्या वेळेस शिवशंकरांचे सतत स्मरण रहावे म्हणून इंद्रदेवाने आपल्या गळ्यात त्यांचा नावाचा गाठा बांधला होता असा उल्लेख खंडोबावरील काही उपासनापर छोट्या पुस्तिकांमध्ये आढळतो. हा गाठावा श्रद्धेने भाविक गळ्यात बांधताना आढळून येतात. विशेषत: शे सोने अगर चांदीच ही परंपरा असून गाठा हा अलंकारा वा बनविला जात नाही.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.