logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

पांडेश्वर

जेजुरीच्या उत्तरपुर्व बाजुस सुमारे १० किमी अंतरावर असलेले पांडेश्वर हे अखंड हिंदुस्थानामध्ये फक्त दोनच ठिकाणी आढळणारे आंध्र प्रदेशातील चेलजी व त्रिविक्रम संस्कृतीमधील साम्यशिवालय. पांडव वनवासात असताना त्यांनी निर्माण केलेले हे शिवमंदिर पांडवेश्वर असे होते, कालओघात त्याला पांडेश्वर हे नाव प्रचलीत झाले. सुमारे ८ व्या व ११ व्या शतकातील दगडी बांधकाम असल्याचे त्याच्या गिलाव्यावरील लेखांवरून समजते. या ठिकाणी मुख्य गर्भगृहातील शिवपिंडी ही विस्तीर्ण दगडी चौरंगावर असल्याने त्याची भव्यता दिसून येते. कऱ्हा नदीकाठी असलेल्या या शिवमंदिरानजिक पांडवांनी पितृश्राद्ध केल्याने आजही काही भाविक येथे श्राद्ध घालतात. त्याला कुंभश्राद्ध म्हणतात. ही सुद्धा वीरभुमी असल्याचे येथे आढळणाऱ्या विरगळ व सतिशिळांवरून दिसून येते. मंदिराच्या लगतच कुंती, धर्म, भिम, नकुल, सहदेव यांची देवकुळे आढळून येतात.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.