logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

श्री क्षेत्र कडेपठार

जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला सपाटीपासून सुमारे ८०० फुट उंचीवर जयाद्री डोंगररांगेच्या माथ्यावर खंडेरायाचे मुळ स्थान कडेपठार मंदिर आहे. येथे शंकर पार्वतीचे स्वयंभु लिंग असून मार्तंड भैरवाची मुर्ती उग्र रूपात दिसून येते. मंदिर दगडी बांधणीचे असून यावर कुठलाही शिलालेख अथवा शिल्पकाराचे नांव आढळून येत नाही. त्यामुळेच हे मंदिर इ. स. पूर्व काळातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे. कुलदैवत खंडेरायाच्या कुलधर्म कुलाचारामध्ये कडेपठार मंदिर स्थळाला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील गणपुजा.... या पुजेला धार्मिक विधींमध्ये मोठे स्थान आहे. पुजेच्या दिवशी स्वयंभु लिंग भंडाऱ्याने अच्छादले जाते. व पुर्ण गाभारा भंडाऱ्याने भरला जातो. रात्रभर सनई चौघड्यांचे वादन व लोककलावंतांची लोकगिते सादर होतात. मर्दानी दसरा - विजयादशमीचा पालखी भेटाभेट सोहळा व आपटापुजन हा विधीदेखील महत्त्वपूर्ण होय. तसेच अश्विन महिन्यात दर शनिवारी रात्री देवाचा छबिना काढला जातो. फाल्गुन शु. प्रतिपदेला कडेपठार मंदिरात पाखाळणी केली जाते. मंदिर साफसफाई करून उत्सवमुर्ती वाजत गाजत बाहेर नंदी मंडपात झोपाळा बांधून त्यावर बसविल्या जातात. रंग खेळला जातो. मंदिर आवारात रांगोळ्या काढून दिपोत्सव साजरा केला जातो. कडेपठार मंदिराच्या परिसरात ऋषीमुनी व तपस्वींची समाधीस्थळे आढळून येतात. मंदिरात जाण्यासाठी ७५० पायऱ्या आहेत.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.