logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

लवथळेश्वर

जेजुरी नगरीच्या पश्चिम दिशेला सासवड- जेजुरी राज्य मार्गालगत पुरातन लवथळेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. लव ऋषींनी हे मंदिर स्थापन करून तपश्चर्या केल्याने त्यांच्या नावानेच लवथळेश्वर हे नांव प्रचलीत झाले. मंदिरातील शिवलिंग हे भुगर्भात आहे. श्री समर्थ रामदास स्वामींचे काही काळ येथे वास्तव्य होते. 'लवथवती विक्राळा.. ब्रह्मांडी माळा' ही शिवशंकराची आरती समर्थ रामदासांनी याच ठिकाणी लिहीली असे. महाशिवरात्री, प्रदोष व श्रावणी सोमवार या दिवशी या ठिकाणी भाविकांची खुप गर्दी होत असते.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.