चैत्र पौर्णिमा

हिंदू कालगणनेनुसार येणारा वर्षातील श्रीखंडेरायाचा पाहिला मोठा उत्सव विविध जाती जमातींचा सहभाग असलेली यात्रा. धर्मपुत्र सप्तऋषींच्या तपसाधने मध्ये व्यत्यय निर्माण करणा-या मणी मल्ल दैत्यांविरुद्ध दाद मागण्यासाठी ऋषीगण देवेंद्राच्या अमरावती नगरी व विष्णूंच्या वैकुंठनगरी मार्गे कैलासावर पोहोचले. सप्तऋषींनी मणी व मल्लासुर दैत्यांचे दुष्कृत्य वर्णन केल्यानंतर श्रीभगवान शंकरानेमार्तंड भैरव अवतार धारण केला त्याचा काळ सांगताना मामार्तंड विजय ग्रंथामध्ये खालील वर्णन आलेले आहे,

      चवदामाजी दुसरा मनु, स्वारोचिष असे अभिधानु |
      त्याचे एकतिसावे द्वापार परिपूर्णु | होता अवतार जालासे || 
      त्या द्वापाराची समाप्ती आली | अठ्ठ्यांशी सहस्त्र दिवस राहिली | 
      ते दिवशी चंद्रमौळी भयंकर रूप धरीतसे ||
      वसंत ऋतू चैत्र मास | शुक्ल पक्ष दोन प्रहर दिवस |
      चित्रा नक्षत्र तुळ रोहिणी विलास | तेव्हा रूप धरी उमापती || 

चौदा मनुमधील द्वितीय स्वारोचिष नामक मनूच्या एकतिसाव्या द्वापार युगाच्या समाप्तीला अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना वसंत ऋतूतील चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात तसेच नभांगणात तुळ राशीतील चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र असताना उमापतीने मार्तंड अवतार धारण केला. चैत्र पौर्णिमेला अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मोठी यात्रा भरते हि यात्रा तीन ते चार दिवस चालते. मार्गशीर्ष महिन्यातील षडःरात्रोत्सावा प्रमाणेच चैत्र शुक्ल नवमी ते पौर्णिमा असे चैत्र षडःरात्रोत्सव साजरे केले जाते.