logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

जेजुरी नगरीचा इतिहास

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार। मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।। १२ व्या शतकातील संत नरहरी सोनारांच्या या ओळी... तर १४ व्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या ओव्यांमधूनही खंडेरायाची महती व गुणगान झाल्याचे दिसून येते. पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी मानल्या जाणा-या जेजुरीचा खंडोबा म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा अवतारच... शंकराचा हा अवतार अत्यंत उग्र-सुर्यासारखा तेजस्वी असल्याने मार्तंड भैरव नावाने प्रचलित आहे. (मार्तंड हे सुर्याचे नांव आहे.) तर बहुजन बांधवांमध्ये मल्हारी मार्तंड या नावाने ओळखला जातो. म्हाळसादेवींचा पती असल्याकारणाने म्हाळसाकांतही म्हटले जाते. मल्लांचा युद्धविरांचा देव म्हणजे मल्ल-हरी 'मल्हारी' ... सर्व साधारण लोकजिवनामध्ये रूढ असलेली संस्कार, परंपरा हे श्रद्धा विश्वाचे तत्त्वज्ञान असते. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा (मल्हारी मार्तंड, | म्हाळसाकांत) ओळखला जात असला तरी भारतीय लोककला, संस्कार, | परंपरेतील लोकदेव म्हणून या दैवताचा प्रचार आणि प्रसार देशविदेशापर्यंत | पोहोचला आहे. विशेषत: दक्षिण भारतात खंडेरायाची अकरा स्थाने असली तरी

या दैवताची राजधानी जेजुरीगडच समजली जाते. जेजुरीत येणा-या भक्तांच्या | संख्येचे मोजमापदंड लावणे तसे अवघडच.... दिनदुबळा, रंजला-गांजला , | गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न होता येथे श्रद्धा भक्ती व सेवेचे दर्शन दिसते. ऐतिहासिक काळात महाराष्ट्रात जी घराणी तलवारीच्या व बळाच्या जोरावर उदयास आली अशा बहुसंख्य घराण्यांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हेच आहे इ. स. ८ व्या शतकात जेजुरी व कडेपठार येथे खंडोबाचे मंदिर बांधल्याचे पुरावे मिळतात. गडकोट मुख्य मंदिर गाभा-यामध्ये प्रवेश करताना द्वाराच्या डाव्या

बाजुला काळ्या संगमरवरात गणेश मुर्ती व उजव्या बाजुला पांढ-या संगमरवरात | यक्ष मूर्तीच्या खाली मोडी (अथवा पाली भाषेत शिलालेख पुसट झाल्यामुळे संदर्भ लावणे जिकरीचे) भाषेत शिलालेख आहे (मात्र मुळ स्थान कडेपठार मंदिर परिसरात कुठलाही शिलालेख आढळून येत नाही.) १३ व्या शतकातील इ. स. | १२४८ मध्ये वीरपाल व वीरमल्ल यांनी जेजुरी गड बांधल्याचे पुरावे मिळतात. मुख्य मंदिर सभामंडपाच्या बाहेर हा शिलालेख पुसटसा झाला आहे. अदिलशहा काळातील राघो मंबाजी खटावकर हे मुळचे जेजुरी वासीय..... खंडोबा भक्त राघो मंबाजीने गडकोट आवारातील सध्याच्या देवस्थान कार्यालयालगत ते पश्चित दरवाजापर्यंत सदरेचे काम १६ व्या शतकात केल्याचे उल्लेख आढळतात. तसेच जेजुरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भाविक व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या | सोयीसाठी भव्य दगडी बांधणीच्या विहीरीची निर्मितीही करण्यात आली होती. | या विहीरीला खटावकर विहीर व सध्याच्या काळात फकिराची - चिल्लाळाची

विहीर म्हटले जाते. इ. स. १५६८ मध्ये आप्पाजी पुवशी सन १६६४ मध्ये | गोविंद कुलकर्णी , श्री गोंदेकरकर, सन १७३२ ते ३६ या काळात होळकर

राजसत्तेचे संस्थापक खंडोबाभक्त मल्हारराव होळकर यांना माळवा प्रांताची | सुभेदारी प्राप्त झाल्यानंतर गडाच्या उत्तर दिशेच्या दरवाजाकडील काम १७८०

च्या काळात तुकोजी होळकर , शामजी राजपुरकर यांनी गडातील रंगमहाल , | बालद्वारी, नगारखाना - तसेच सरदार चौगुले, घाडगे, घोरपडे आदी नामवंत | मराठी घराण्यांनी गडकोटासह दिपमाळा, वेशी, कमानी यांचे काम केल्याचे | उल्लेख येथे आढळून येतात. होळकर घराण्यातील धर्मनिष्ठ, दानशूर पुण्यश्लोक

अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी नगरीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. नगरीच्या विकासाच्या शिल्पकार म्हटल्यास वावगे ठरू नये. ऐतिहासिक होळकर तलाव , चिंचेची बाग, चिलावती कुंड आदी वास्तुंची त्यांनी निर्मिती केली. (सध्या देवसंस्थानच्या भक्तनिवासाच्या इमारतीच्या जागी पुर्वी चिलावती कुंड | होते.) साता-याचे शाहू महाराज यांच्या आदेशानुसार दुसरे बाजीराव पेशवे यांनी

पुर्व बाजुस पेशवे तलावाची निर्मिती करून शहराच्या सौंदर्यात भरच घातली. | गडकोटावर जाता - येताना ४५० पाय-या आहेत. (यालाच ९ लाख पायरी - | दगड म्हटले जाते.) १८ कमानी, ३०० दिपमाळा आहेत. बहुतांश दिपमाळा वेशींची डागडुजी दुरूस्ती करण्याची गरज आहे. देवसंस्थानच्या वतीने लवकरच हे काम हाती घेतले जाणार असून त्यासाठी दानशूर भाविक भक्तांच्या सढळ हातांची गरज आहे.

गडाच्या मुख्य मंदिर मेघडंबरीमध्ये मार्तंड भैरवाची भव्य पाषाणमुर्ती आहे. हेच या देवाचे प्रतिक समजले जाते. मुर्तीच्या समोर पाच खंडोबा व म्हाळसादेवींच्या जोड मुर्ती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सावत्र भाऊ तंजावरचे व्यंकोजी महाराज यांचे पाचवे वंशज शरीफजीराजे यांनी नवसपूर्तीसाठी मुर्ती देवाला अर्पण केल्या आहेत. आजही मुर्तीवर तसा स्पष्टपणे उल्लेख आढळून येतो. साताऱ्याचे शाहु महाराज व श्रीमंत पेशवे यांनी देखील मुर्ती अर्पण केल्याचे पुरावे मिळतात. जेजुरी नगरीमध्ये अंदाजे सुमारे २८ जातीधर्माचे समाजबांधव प्राचीन काळापासून वास्तव्यास असून धार्मिक रूढी, संस्कार, परंपरा, जत्रा यात्रा उत्सवांमध्ये हे समाजबांधव मानकरी आहेत. पुरातन व प्राचीन वारसा लाभलेल्या नगरीमध्ये अनेक नामवंत घराण्यांचे भलेमोठे चौसोपी वाडे मागील दोन पिढ्यांपर्यंत अस्तित्वात होते. छत्रपती शिवाजी महाराज, साताऱ्याचे शाहु महाराज, नागपुरकर भोसले, बडोदेकर गायकवाड, श्रीमंत पेशवे, महाराजा होळकर, पंत सचिव, सरदार साखळदंडकर, पानसे, पुरंदरे, चांबळीकर सरनाईक सरलष्कर दरेकर आदी राजे महाराजे सरदार,दरकदार आदींचे वास्तव्य या वाडा संस्कृतीतून येथे असल्याचे इतिहासकार सांगतात. सध्या सिमेंटच्या वाढत्या जंगलात वाडा संस्कृती लोप पावली असली तरी आजही काही वाडे अस्तित्त्वात आहेत.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.